
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.१८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे.१७ जिल्हात या निवडणुका होणार आहेत.
दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर ,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर,औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद,लातूर,अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणे करून ५ जुलैला प्रसिद्ध करण्यात आले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ही २० जुलै अशी ठरविण्यात आली आहे.तर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी २२ जुलै ते २८ जुलै असणार आहे, म्हणजेच या तारखेत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.यात रविवार असल्यास उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी तीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.अर्जांची छाननी झालेल्या उमेदवारांची यादी ही २९ जुलैला सकाळी अकरा वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तसेच अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही ४ ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत अशी दिली आहे.अर्जावर काही आक्षेप अथवा अपील असल्यास आठ तारखेपर्यंत म्हणजेच ८ ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात येणार आहे.१८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.तसेच मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची तारीख ही १९ ऑगस्ट शुक्रवार अशी देण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून हे निकाल जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे, असा एकूणच हा निवडणूक कार्यक्रम असणार आहे.