
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर सर्कल- हनुमंत श्रीरामे
सामान्य एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले साहेबराव काळे पाटील एक आगळ वेगळ कर्तुत्वातून सिद्ध झालेलं एक भक्कम नेतृत्व होय.
अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावी म्हणजे धावरी तालुका लोहा येथे जनतेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाजाच्या प्रश्नावर काम केले.दहा वर्षे गावची सेवा करत असताना गोरगरिबांच्या सुख दुखात त्यांनी स्वतःला झोकून टाकलं होतं. गाव तिथं भानगडी असतात आणि अडचणी असतात, वाद-विवाद असतात पण जेंव्हा जेंव्हा गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यावेळी मात्र स्वतःच्या गावात दहा वर्ष सरपंचपद सांभाळत असताना काम करत असताना गावातील वाद-विवाद कधीच पोलीस स्टेशन पर्यंत येऊ दिले नाहीत गावचे भांडण-तंटे गावातच मिटवले. पद दोन दिवसाच असतं पद राहील आथवा जाईल, सत्ता राहिल अथवा जाईल सत्ता ही ऊन सावली सारखे असते पण गावातले भांडण गावातच मिटावे यासाठी गावात सर्वात पहिल्यांदा तंटामुक्ती भवन त्यांनी बांधले गावचे प्रश्न गावात मिटवले.गावात शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत गावातील जनतेचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे अशा अनेक प्रश्नांनवर त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले त्यांच्या कार्याची ज्योत आजही कलबंर सर्कल आणि परिसरात झळकत आहे. 1998 पासून मा
खासदार श्री.प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत मोठ्या विश्वासाने निष्ठेने काम करत असताना आपण त्यांना पाहतोय,त्यांच्या कामामुळे त्यांची एक वेगळी छाप परिसरात आहे,गेल्या दशकापासून आपण पाहतोय की कलंबर सर्कल आणि परिसरामध्ये जनतेच्या प्रश्नावर अतिशय पोटतिडकीने प्रामाणिकपणे काम करत आहेत, शेतकऱ्यांचा पिक विमा,अतिवृष्टी अनुदान,शेतकरी नुकसान भरपाई, या संदर्भातून वृत्तपत्रातून आपली भूमिका ठामपणे मांडताना अनेकदा आपण त्यांना पाहील आहे. कलंबर सर्कल आणि परिसराला एक एक माणूस त्यांना अत्यंत जवळून ओळखतो,कारण त्यांनी प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाऊन त्यांची कामे केले आहेत राजकारणाच्या पलीकडे समाजकारणातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती म्हणजे साहेबराव काळे पाटील.
जी माणसं समाजात काम करतात त्यांच्याकडून चूक होत असं नाही चुका होतात पण स्वतःची चूक झाली तर ती चूक दुरुस्त करून आणि जर का सोबतच्या सहकार्याच काही चुकलं तर ते नजर अंदाज करून चालणारे व त्यातून मार्ग काढून चुका या माणसाकडून होतात आणि चुका दुरुस्ती ह्या सुद्धा माणसाकडून होतात अशा उदार अंतकरणाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे दिलखुलास दिलदार नेतृत्व म्हणजे साहेबराव काळे पाटील.
राजकारणात वैचारिक मतभेद असतात घटतट असतात, प्रत्येक जण एकमेकांच्या उणीवा शोधत असतात पण खऱ्या अर्थाने विरोधकाने देखील तुम्हाला चांगलं म्हणावं एवढा चांगुलपणा हा तुमच्यामध्ये दिसतो ते म्हणजे साहेबराव काळे पाटील, आज 10 जुलै आपला वाढदिवस आणि आषाढी एकादशीही खऱ्या अर्थाने पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना की येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितच राजयोग घडो जिल्हा परिषद सदस्य हे नाव आपल्यासमोर लागो हीच पांडुरंगा चरणी विनवणी…….
—लेखन —
प्रदिपभाऊ पुंडलिकराव वाघमारे
9763387457