
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- रामेश्वर केरे
गंगापूर तालुक्यातील ३५ कोतवालपैकी ९ कोतवाल तहसील कार्यालयातील महत्वाच्या पदावर काम करताना आढळून येत आहेत तर एका कोतवालाची वैजापूर येथे प्रतिनियूक्ती करण्यात आली आहे.
गंगापूर तालुक्यामध्ये एकूण 55 तलाठी सजा आहेत मात्र केवळ 35 तलाठी सजावर कोतवालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
35 कोतवाला पैकी ९ कोतवाल तहसील कार्यालयातील विविध विभागात कामाला लावण्यात आल्याचे दिसून येतआहे वास्तविक पाहता या कोतवालांनी आपापल्या तलाठी सज़ावर काम करणे अपेक्षित आहे.
सजाच्या ठिकाणी कोतवाल नसल्यामुळे
लोकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. तसेच
गावांमध्ये अनेक प्रकारच्या कामांची
प्रशासनाला माहिती त्यामुळे वेळेवर भेटत
नाही. याच अनुषंगाने मंत्रालय विभागातील
महसूलचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार
श्रीवास्तव यांनी एक परिपत्रक काढले असून
त्यामध्ये कोतवालांच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास संलग्नित न करता संबंधित सजा कार्यालयास त्वरित वर्ग करणेबाबत लेखी सूचना केल्या आहेत. व तसा पत्रव्यवहार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना केला आहे; असे असताना कोतवाल तहसीलमध्ये विविध विभागात काम करीत आहेत.
या शिवाय कार्यालयात काम करणाऱ्या काही कर्मचारी वर्गाला संगणकीय ज्ञानच नाही त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना संगणकीय ज्ञान आहे त्या कर्मचाऱ्यावर एकापेक्षा अधिक विभागाचे कामकाज दिल्याने कामाचा ताण वाढून त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे
काही ऑन ड्युटी आहेत ते कर्मचारी चहा पिण्याचा बहाणा करून तासंतास बाहेर बसत असल्याने नागरिकाचे काम रखड़ले जात आहेत.
मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सचिन सपकाल यांची गंगापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणून बदली करण्यात आली मात्र त्यांनी पुरवठा विभागाचे कामकाज पाहणे ऐवजी महसूल विभागाचा कारभार पहात आहेत.तसेच पुरवठा विभागात झिरो व्यक्ती देखिल कार्यरत आहेत स्वस्त धान्य दुकानदारांचे चलन भरून घेणे, शिधापत्रिका बनवण्याचा कारभार ते “लक्ष्मी’दर्शन घेऊन चालवत आहेत.
पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक हैराण :- तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अस्ताव्यस्त लावल्या जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील पार्किंगबाबत कोणीही उपाययोजना करीत नाही प्रत्येकाची याठिका मनमानी सुरू आहे त्यामुळे कुणीही या आणि पार्क करा, अशी परिस्थिती दिसून
येत आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष
घालून पार्किंगची व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत गंगापूर तहसीलदार सतिश सोनी यांच्यासोबत संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.