
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
विठ्ठल विठ्ठल | उधळीत रंग
नाराज श्रीरंग | क्रोधभरा १
रंक का उपाशी । राव तो तुपाशी
भांडावे कुणाशी | आकळेना २
रोज मरे त्यास । पुसेना रे कुणी
असे जरी गुणी । दुर्लक्षित ३
जागो जागी चाले । भ्रष्टाचार सारा
डांब त्यांना कारा । आवर्जुन ४
कोटींची उड्डाणे । पारावार नाही
कसा रे तू पाही । आंधळ्याने ५
औषधे महाग । महाग शिक्षण
कैसी विलक्षण । परिस्थिती ६
विठ्ठला विठ्ठला । न्याय कधी देशी
नको रे विदेशी 1 हस्तक्षेप ७
मरे कास्तकर । रडे कामगार
खासा देवदूत । पाठव रे ८
थोप नाही जरा । मूक आसवांना
लाभू दे सर्वांना । समाधान ९
काय ते डोंगर I काय बरं झाडी
पुरे एक काडी । पेटविण्या १०
पांडुरंगा आता । बस्स खेळ सारे
थांबूदे आता रे । कायमचे ११
सुनील चिटणीस
जुलै २०२२