
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड: तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच गावातील शासकीय इमारती व सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी अशोक दांडगे, सहाय्यक गट विकास अधिकारी डी. एस. आहीरे, विस्तार अधिकारी पंचायत एस. आर. शेळके, विस्तार अधिकारी पंचायत पी. बी. दौड यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी बुद्रुक येथे वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्व वयवृद्ध नागरिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गावातील एकूण १४७ वयोवृद्धांची श्रावणबाळ योजनेअंतर्गत पगार चालू करण्यात आलेली असून त्यांच्यासाठी गावांमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले असुन ग्रामपंचायत वांगी बुद्रुकतर्फे त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे आश्वासन सरपंच ज्योती बापूराव काकडे यांच्या वतीने देण्यात आले. उपसरपंच ज्योती लक्ष्मण साळवे, ग्रामसेवक एल. आर. कोळी, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव साळवे, माधवराव तायडे, संतोष काकडे, पर्यागबाई काकडे, वैशाली काकडे, रुकसाना नईम शहा आदींची उपस्थिती होती.