
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांची आरती… दिंडी सोहळा… त्यासाठी शाळेतील विद्यार्थी यांनी वारकरी पोशाख ..परिधान केला होता टाळ, मृदंग … झेंडे ,तुळशी वृंदावन घेऊन अभंग ,ओव्या, गीते म्हणत व विठ्ठल नामाचा गजर असा भक्तिमय सोहळा पारडीच्या सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळेने आयोजित केला होता सह शालेय उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सह्याद्री चे संस्थापक सुदर्शन शिंदे व संचालिका सौ जयश्री शिंदे यांचा प्रयत्न असतो. पावसाची रिपरिप असतानाही पारडीच्या विक्की गार्डन मध्ये विठ्ठल नामाची शाळा भरली होती.
सह्याद्री इंग्लिश स्कुल मध्ये आषाढी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षा पासून या शाळेत आषाढी निमित्ताने वारकरी पोषकात विद्यार्थी दिंडी काढली जाते रिपरिप पाऊस होता त्यामुळे सेवा निवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वांबर मंगनाले यांनी विक्की गार्डन या शाळेसाठी उपलब्ध करून दिले.लोहगड येथील गुरुद्वारा साहिब संस्थान व सह्याद्री ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी महोत्सव व दिंडी सोहळयाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नागेश हिरास होते , प्रमुख अतिथी म्हणून लोहगड- नांदेड येथील गुरुद्वारा साहिब संस्थानाचे मुख्य व्यवस्थापक बाबाजी बंटी सिंगजी , बाबाजी रणजीत सिंगजी व बाबाजी मख्खन सिंगजी त्यासोबतच सह्याद्री ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स चे संस्थापक संचालक सुदर्शन शिंदे , संचालिका सौ. जयश्री शिंदे यांची उपस्थिती होतीआषाढी एकादशी महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्ती पूजन करण्यात आले.
एकीकडे पावसाच्या धारा तर दुसरीकडे भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव त्यातच संजय देशमुख यांच्या भाव गीतांची मैफल वातावरण भक्तिमय करणारे ठरले विद्यार्थी प्रणव चौडेकर, प्रार्थना चौडेकर, साधना देशपांडे यांची साथ लाभली.
पाचवी वर्गातील विद्यार्थिनी अनुष्का बेद्रे हिने आषाढी एकादशी निमित्त मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप शाळेचे प्राचार्य नागेश हिरास यांनी केले.संचलन सौ .अनुपमा कोलते व श्री शाहू लक्ष्मीकांत यांनी तर . आभार सुमित चौडेकर यांनी मानले छायाचित्रणाची जबाबदारी शिक्षक श्री बनसोडे व श्रद्धा पाटील , स्नेहा करोसिया यांनी पूर्ण केली . नियोजनासाठी सह्याद्री इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले, सह्याद्री प्रि स्कूल च्या मुख्याध्यापिका रुख्मीन धोंडगे, पर्यवेक्षक काशीनाथ पांचाळ, अमोल सिरसाठ, राजीव पौळ, ओमकिरण सिरगे, अझर शेख, मंजुषा बासटवार सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले