
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील ग्लोबल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.
आषाढी एकादशी चे विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून लोहा येथील ग्लोबल इंग्लिश मध्ये आषाढी एकादशी कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गंगाधर पेंटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, नगरसेवक संदीप दमकोंडावांर, नगरसेवक नबी शेख , आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यात विठ्ठल -रुखमाईचा जीवंत देखावा करण्यात आला तसेच यावेळी प्रथम विठ्ठल-रुखमाईची विधीवत पूजा मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते करण्यात आली.
तसेच यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुखमाईची वेषभूषा केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमातील सहभाग नोंदविलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाचे सादरीकरण करून भक्तीमय वातावरणात निर्माण केले.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक दिनेश मोटे, प्रिन्सीपल मनोजकुमार सर व ग्लोबल इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षकवृंद , कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.