
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी एक स्तुत उपक्रम
जव्हार:- तालुक्यातील शिरोशी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कळमविहिरा येथे महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या दासांनी जवळपास १५० विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना करण्याचा निर्धार त्यांनी केला.
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व ‘झाडे लावा झाडे जगवा’ या उक्ती प्रमाणे समोरील गाव-पाड्यातील दासांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला.