
दैनिक चालू वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी- सलमान नसिम अत्तार
एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी साजरी करण्यात आली.
चांडोळ येथील हिंदू बांधवानि मुस्लिम बांधवाना ईद ची शुभेच्छा दिली व मुस्लिम बांधवानी हिंदू बांधवाना एकादशी ची शुभेच्छा दिली.
. आज दिवस भर रिमझिम पाऊस सुरु होता म्हणून ईद चा व एकादशी निमित्य भरणारी जत्रा चा जास्त आनंद घेता आला नाही.
एकादशी निमित्य गावात विठ्ठलरुक्मई मंदिरा जवळ जत्रा चे आयोजन केले जाते. दुकानदारांनी दुकान तर लावली पण पाण्या मुळे जत्रा जास्त भरलीच नाही.
तसेच ईद निमित्य लहान मुलांना पाण्या मुळे जास्त नातेवाईकांचा घरी शुभेच्छा द्याला जाता आले नाही.
(बकरी ईदची पौराणिक कथा)
हजरत इब्राहिम यांना अल्लाने आपल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. अल्लाने सांगितले असल्याने तेही ही गोष्ट करण्यास तयार झाले होते. या मुलाचे नाव इस्माईल असे होते. पोटचा मुलगा असल्याने इब्राहिम यांना तो अतिशय लाडका होता. पण अल्लाचाआदेश पाळणे गरजेचे असल्याने त्यांनी ही अतिशय कठीण गोष्ट मान्य केली. आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झालेल्या हजरत इब्राहिम यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातात सुरा देण्यात आला. मात्र त्याचवेळी अल्लाने त्यांना खुश करायचे ठरवले. आणि प्रत्यक्ष बळी देण्याच्या वेळी मुलाच्या जागी एक बकरा आणून ठेवला. देवाच्या या कृतीमुळे इब्राहिम देवावर खूपच खुश झाले, कारण आपला मुलगा त्याला कायमसाठी मिळणार होता. तेव्हापासून या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो. या सणामागे त्यागाची भावना असल्याचे सांगितल्या जाते.