
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतीनिधी-प्रमोद खिरटकर
गडचांदूर – नांदा फाटा ह्या रस्त्यावर नांदा फाटा येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून सध्या पावसाळा सुरू असल्याने या खात्यामध्ये एक ते दीड फूट खोल पाणी भरलेले असते त्यामुळे लहान वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही भोयगाव मार्गावरची वाहतूक आवड पुर मार्गे वाढविल्याने रस्त्याची कमालीची रांग या मार्गावरून धावत असते विद्यमान आमदार साहेबांच्या प्रयत्नाने रस्ता मंजूर होऊन कामाला सुद्धा सुरुवात झाली मात्र प्रशासकीय कारणे ठेकेदाराची मनमानी व पावसाळ्याचे दिवस ही कारणे पुढे दाखवत तो रस्ता बीबी शेजारी येऊन थांबला त्यामुळे बिबि ते आवाळ पुर हा रस्ता जैसे थे स्थितीमध्ये राहिल्या कारणाने तो भविष्यात होईल की नाही अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली असून कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये याकरिता परिसरातील नवयु वकानी रस्त्याच्या मध्यभागी गतिरोधक म्हणून वेरी ग्रेट लावल्याचे चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे आता तरी सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग उपविभाग गडचांदूर यांनी त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवा वे अशी मागणी जोर धरत आहे.