
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
धडगांव तालुक्यातील दुर्गम भागातील गोराळी गावाचे समाजिक कार्यकर्ते केवजी पाडवी,दारासिंग जान्या पाडवी,रमीबाई वळवी व सरदार गवळे,गंगाराम परमार यांची धडगांव तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. हि निवड यांच्यातील सामाजिक दायित्वाची दाखल घेत करण्यात आली असून शासनाने त्यांच्यावर एका सेवेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील संभाव्य भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करण्यात होती हि समिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली होती.
शिवाय प्रत्येक तालुका स्तरावर देखील समिती करण्याचे आदेशीत केल्याने सदरिल समाजसेवकाचे या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आदिवासी विकास तथा पालकमंत्री ऍड.के. सी. पाडवी, जि. प.समाजकल्याण सभापती रतन पाडवी,जि.प.सदस्य जान्या पाडवी,जि.प.सदस्य रुपसिंग तडवी,जि.प. सदस्या संगिता पावरा,हारसिंग पावरा,पं.स सदस्य विलास पाडवी,गोविंद पाडवी यांच्यासह संपूर्ण राजकीय व सामाजिक वर्तुळातून गौरव करण्यात आला.