
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
:जळगांव जा.: दि.१०.भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भीम नगर येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये दहावी, बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला करण्यात आला व क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्राविण्य प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला व तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी प्राविण्य प्राप्त केले अशांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
समता सैनिक दलाच्या जवानांना सुद्धा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
आद. बुद्धरत्न गौतम अरदळे या विद्यार्थ्याने पाॅली ॲग्री मध्ये यश संपादन केले, डाॅ. मिलिंद ओंकार निंबाळकर एम.बी.बी.एस.,डॉ. करण सुभाष पारवे बी.ए.एम.एस., प्रतिक समाधान तायडे राष्ट्रीय चॅम्पियनशिप भालाफेक मध्ये गोल्ड मेडल पटकवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, अनिकेत संतोष वानखडे आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप भालाफेक मध्ये गोल्ड मेडल पटकावले यांचा सुध्दा सन्मान प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. जगदीश हातेकर ता-अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते .कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रा.सुभाष सिरसाट ता-सरचिटणिस, अनिल तायडे ता-कोशाध्यक्ष, विनोद शेगोकार, देवानंद आठवले, परमेश्वर पारवे ,अनिल इंगळे, मोहन इंगळे जी -हिशोब तपासणीस ,साहेबराव भगत माजी ता-अध्यक्ष, बौद्धाचार्य भाऊराव निंबाळकर, संतोष इंगळे, संजय तायडे, गौतम अरदळे, भास्कर जुमळे सैनिक, आनंद लहासे सैनिक, ॲड जितेंद्र सावळे, उदेभान धुंदाळे सर हे होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद.राजाभाऊ कोकाटे सर, आद.के.के.घाटे सर, आद.अरुण भाऊ पारवे वंचित बहुजन आघाडी जी-संघटक, आद.मोहन इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद.प्रा.सुभाष सिरसाट यांनी केले व प्रास्ताविक आद.अनिल तायडे यांनी केले कार्यक्रमाचे शेवटी सरनत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.