
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
मयत युवकाचे पार्थिव कहाळा येथे सापडले
सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असुन या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आले असून या पुरात तीन दिवसांपूर्वी दहिकळंबा ते चिखली दरम्यान पुराच्या पाण्यात एक युवक वाहुन गेला होता त्या युवकाच्या शोधाकरिता महसूल प्रशासनाने लोहा तहसीलचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार राम बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केले होते या पथकाच्या अथक परिश्रमानंतर सदरील युवकांचा शोध पथकाने लावला असुन पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की
मागील शनिवारी दि. ९ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे कंधार तालुक्यामधील दहीकळंबा ते चिखली दरम्यान एक तरुण पुरामध्ये वाहून गेला होता त्याचा शोध मागील तीन दिवसापासून महसूल प्रशासन घेत होते अथक परिश्रमानंतर आज दि. ११ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास कहाळा तालुका नायगाव येथील नदीच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये सदरील युवकांचा मृतदेह आढळून आला असुन त्यांची ओळख ही पटली या मयत युवकांचे नाव अंकुश हरीचंद्र सावंत रा.लहान ,ता. अर्धापूर जि.नांदेड येथील रहिवासी आहे.
सदरील कामी महसूल विभाग कंधार व लोहा यांनी मेहनत घेतली या पथकात पथक प्रमुख राम बोरगावकर व त्यांचे सहकारी कर्मचारी मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे मंडळ अधिकारी दत्ता कटारे , तलाठी मारुती कदम, मनोज जाधव, संतोष आस्कूलकर ,मोतीराम पवार, दिलीप मदेवाड ,चिलकेवार, जाधव ,दुधाटे, रेणके इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
अशी माहिती पथक प्रमुख नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली.