दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकारा.
जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद
झाडे उन्मळून पडली तर सखल भागात घरात पाणी
जव्हार -जव्हार शहर हे समुद्र सपाटीपासून एक हजार आठशे फूट उंचीवर आहे.मिनी महाबळेश्वर,थंड हवेचे ठिकाण म्हणूनही जव्हारला ओळखले जाते.त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असून मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू पावसाने कहर केला असून धो-धो बरसणाऱ्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे.१४६ मीमी पावसाची नोंद करण्यात आली असून ती पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.असे जरी असले तरी तालुक्यातील अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत.दाभोसा धबधबा,खडखड धरण,हिरडपाडा,काळमांडवी धबधबा तर शिरपामाळ,सनसेट पॉइंट,हनुमान पॉइंट असे पर्यटनस्थळे आहेत.
बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे खेडोपाड्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.अनेक घरांची पडझड तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर मुख्य वीज वहिनी तुटून नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे, अद्याप पर्यत सात घरांची पडझड झाली आहे. नागरीकांनी कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये, नदी ओहोळ कडे जाऊ नये.
आशा तामखडे,तहसीलदार, जव्हार
