
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी .
माण तालुक्यांतील दहिवडी पिंगळी गोंदवले अशा विविध ग्रामीण भागांतून बेंदूर सण उत्साहांत साजरा करण्यांत आला. भारत हा कृषिप्रधान देश आहे देशांतील बहुतेक सण-उत्सव हे शेतीशी निगडित असतात असाच एक सण म्हणजे बेंदूर म्हणजेच बैलपोळा बैलांप्रती कृततज्ञा व्यक्त करणारा हा मराठी सण असून शेतकरी बांधव मोठ्या उत्साहांत हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. आषाढी एकादस झाल्यानंतर प्रथेनुसार अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपणारा बेंदूर सणाची शेतकऱ्यांना चाहूल लागून राहते. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम देऊन त्यांची विदवत परंपरेनुसार पूजा केली जाते. ज्यांच्याकडे बैले नाहीत असे लोक घरी मातीच्या बैलाची पूजा करतात महाराष्ट्रीय आणि कर्नाटक अशा राज्यांमध्ये बेंदूर हा सण मोठ्या उत्साहांत शेतकरी बांधव साजरा करत असतात. या दिवशी बैलांना मोठा थाट माटांत करुन त्यांची गावांतून भव्य मिरवणूक काढतात पोळ्यांच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यांत येते त्यांच्या खांद्याला हळद व तुपांने शेक दिला जातो. नंतर बैलांना सजवतात त्यांना रंगरंगोटी करतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुल घालतात शिंगणा बेगड, डोक्यांला बाशिंग गळ्यांत घुंगरांच्या माळा घालतात या दिवशी बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. यंदा बेंदूर सणांच्या तोंडावर दिवसभर ग्रामीण भागात पावसाचा जोरही कायम होता भर पावसांत पारंपारिक वाद्ये वाजत गाजत शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा राजाची भव्य मिरवणूक काढली