दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
तीन चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पूर्ण मोलगी परिसर हादरून टाकला असून पूर्ण परिसर जलमय झालेला आहे.अशा परिसथितीमध्ये परिसरात अनेक ठिकाणी नद्यांना मोठे पुर आल्याने व दोरड कोसळल्याने रस्ते वाहतूक बंद झालेली आहे.अशीच परिसस्थीती भगदरी येथील गावांतील नर्मदा काठावरील गावांना जोळणारा मुख्य रस्ता पाण्याने तोडल्याने समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे नर्मदा काठावरील लोकांना मुख्य गावांना संपर्क करणे कठीण झाले आहे.
भगदरी येथील हा मुख्य पुल कंजाला,मांडवा,डनेल मुखूडी,मोजापडा,वानवाईपाडा वेलखेडी,डेब्रामाड,तसेच शासकीय आश्रम शाळा भगदरी यांना जोळणारा मुख्य रस्ता आहे त्यामुळे प्रशासनाने या रस्ता व पुलाच्या कामासाठी लवकरात लवकर प्रयत्न करने आवश्यक आहे.
