
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
खैरा (नांदुरा) दि.१३. वीर सावरकर सार्वजनिक वाचनालय खैरा येथे शिवरत्न शिवा काशीद स्मृतीदीना निमीत्त व्यसनमुक्ती वर प्रबोधन कार्यक्रम दि.१२ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम मापारी माजी ग्रामपंचायत सदस्य लाभले होते, तर अध्यक्ष म्हणून युवा कार्यकर्ते प्रकाश ढोले लाभले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरत्न शिवा काशीद यांच्या प्रतीमेला हार अर्पण व ग्रंथ पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लिपिक संदीप गणगे यांनी केले,तर प्रास्ताविक ग्रंथपाल विजय गणगे यांनी केले. वाचनालयाच्या वतीने मान्यवरांचा ग्रामगीता सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम मापारी यांनी सांगितले की आजचा नवयुवक व्यसनाधीन होत चालला आहे, तरी त्याने वाचनालयात येऊन वाचन केले पाहिजे म्हणजे त्याचे ज्ञान वाढेल व तो व्यसनमुक्त होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश ढोले शिवरत्न शिवा काशीद यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. शेवटी आभार प्रदर्शन शिपाई दिपक गणगे यांनी केले. कार्यक्रमाला नितीन मापारी, चंद्रकांत कोळसकर,गोकुळ दिवाने, रामकृष्ण गावंडे व ईतर वाचकवर्ग ऊपस्थीत होते. चहापाणाने कार्यक्रमाची सांगता झाली.