दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी-प्रमोद खिरटकर
कोरपना तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने धो धो झोडपले उभ्या पिकाची नासाडी अनेक जमिनी खरवडल्या धरणाचे पाणी क्षमतेपेक्षाही अधिक वेगाने वाहू लागले कोरपणा तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून पिकाची नासाडी झाली तर अनेक जमिनीवरुन पुराच्या पाण्यामुळे नासाडी झाली कोरपणा पंचकोशीतील पकडी गड्डम जलाशय पहिल्यांदा दीड मीटर पेक्षा अधिक उंचीने सांडव्यावरून पाणी गेल्यामुळे काठावरील गावाच्या शेजारी संपूर्ण नाले ओढे दोन थड्या भरून वाहू लागले धानोली तांडा येथील पहिल्यांदा पुलावरून पाणी वाहू लागल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली. पकड्डीगडम जलाशयातील माशाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून मच्छीमारांचे लाकडी डोगें मासेमारीजाड्या वाहून गेले मत्स्यबिज व मासोळीवाहून गेल्याने मच्छीमाराचे मोठे नुकसान झाले तर रात्री झालेल्या पावसाने अनेक कच्च्या घरांची पडझड तसेच शेतामध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली अतिवृष्टी पावसाचा फटका नाल्याकाठावरील धानोली कुसळ माथा शेरज या गावाच्या काठावरील अनेक शेतकऱ्यांना बसला असून शासनाने पंचनामे करून दिलासा द्यावा.
