दैनिक चालू वार्ता मोलगी प्रतिनिधी -रविंद्र पाडवी
मोलगी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या मार्फत वृक्षारोपण सप्ताह निमित्त शासकीय आश्रम शाळा दाब येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बार्टी पुणे समतादूत प्रकल्पामार्फत वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येत आहे शासकीय आश्रम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक गेमलसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या आवारात विविध प्रकाराच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. बार्टीचे धडगांव अक्कलकुवा तालुका समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनी स्थानिक लोकांचे सहकार्य मिळत नाही, जोपर्यंत स्थानिक लोकं वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करत नाहीत, तोपर्यंत हे शक्य नाही असे मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे अधीक्षक मंगेश वसावे यांनी विद्यार्यांना झाडे लावा झाडे जगवा विद्यालयात आँक्सिजन झोन निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच शाळेचे अधीक्षक मंगेश वसावे बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी,वनसिंग वळवी प्रा,शिक्षक ,वनसिंग वसावे प्रा,शिक्षक,अमरसिंग राऊत प्रा,शिक्षक,करमसिंग पावरा प्रा,शिक्षक यावेळी शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी विद्यार्थींनीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
