दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील मतदार यादी मध्ये अनेक गोंधळ आहेत,अनेक तक्रारी या प्राप्त झाल्या आहेत काही प्रभागांमध्ये आठ आठ नऊ हजार नावे इकडची तिकडे तिकडची इकडे झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेली ९ जुलै ची दिलेली मुदत पुरेसी नव्हती ती १६ जुलै पर्यंत वाढवून दिलेली आहे. तरीदेखील आज परिस्थितीचा आढावा घेतला तर या मुदतीत सगळ्या याद्या निर्दोष होणे शक्य नाही असे वाटते. म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्याकडे अजून ८ दिवसाची मुदत वाढवून मागावी व मतदार याद्या जास्तीत जास्त निर्दोष कराव्यात अशी मागणी मनपा आयुक्तांकडे माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे. तसेच ह्या माननीयांनी त्यासंबंधीचे एक निवेदन निवडणूक आयोग, मुंबई यांचेकडेही पाठविले आहे.
