
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग NH-6 वर नांदगाव पेठ जवळ भीषण अपघात झाल्याची घटना आज दुपारी १३ जुलै २०२२ ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.भरधाव वेगाने येत असलेल्या दोन कंटेनरमध्ये सामोरा-समोर जोरदार धडक झाली असता घटनास्थळी या अपघातात एक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
माहितिप्राप्तीनुसार,अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ येथे उड्डाण पुलावर भरधाव वेगाने असलेले दोन कंटेनर मध्ये सामोरा-समोर जोरदार धडक मारली.या घटनेत एक जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले.जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हद्दीतील पोलीस प्रशासन करीत आहेत.