
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
लोहा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार होती.नदी -नाले ओढे तुडुंब भरून वाहत होते. तालुक्यातील सहाही मंडळ विभागात अतिवृष्टी झाली आहे कापशी विभागात सर्वाधिक म्हणजे १५३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली तर माळाकोळी विभागात ९४ मिमी पाऊस नोंदविला गेला.तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तालुक्याती पूर जन्य स्थिती व अन्य कोणती हानी झाली तर त्याचे तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला रिपोर्टिंग करावी असे निर्देश दिले तर नायब तहसीलदार राम बोरगावकर व टीम संततधार पावसात कर्तव्यावर हजर होते व ग्रामस्थांना उपदेशन करीत होते
दोन दिवसा पासून लोहा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे.या पावसाची संततधार सुरू आहे.एक दोन कोळपे फिरले तर काही ठिकाणी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या.सतत झालेल्या पावसामुळे गावातील नदी नाले ओढे भरभरून वाहत होते.सकल भागात पाणीच पाणी झाले आहे शेतात पाणी साचल्याने पिके धोक्यात आली आहेत.
अतिवृष्टीची माहिती तात्काळ द्या – तहसीलदार मुंडे
तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासून मुसळधार पाऊस सुरू आहे तेव्हा सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांनी अतिवृष्टी व पुराच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावात मंगळवारी रात्रीपासून ते आज बुधवार पर्यंत काही जीवित हानी झालेली असेल तर त्याचा अहवाल तात्काळ व्हाट्सअप च्या द्वारे नैसर्गिक आपत्ती ग्रुप वर कळविण्यात यावा
तसेच कोणत्या गावाचा किंवा वाडी तांडा यांचा संपर्क पुरामुळे तुटला असल्यास तसे कळवावे . असे संपर्क तुटलेल्या गावातील किंवा वाडी तांड्यावरील नागरिकांना नदी व नाल्यामध्ये पाण्यात न उतरण्याचा इशारा देणयात यावा.असा सूचना लोहा कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिल्या आहेत.
तहसीलदार – नायब तहसीलदार पावसात गावोगावी
———————
गेल्या दोन दिवसा पासून सुरू झालेल्या पावसाच्या संततधार मुळे पूर जन्य स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे .तहसीलदार व्यंकटेश मुंडे त्याच्या सोबत तलाठी कदम यांनी बुधवारी दुपारी पेनूर भागाचा दौरा केला व पाहणी केली लोकांना सतर्क राहण्याचे सांगितले तर नायब तहसीलदार राम बोरगावकर व त्याच्या सहकाऱ्यांनी कापशी मारतळा भागात पावसात जाऊन पाहणी केली लोकांना काळजी घेण्याची आहवान केले.अतिवृष्टी मध्ये तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे.