
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
१२ जुलै १६६० ला छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरचा वेडा फोडून पन्हाळगडावरून विशाळगडला जातात त्यावेळी वीर शिवा काशीद यांचे महत्त्वाचे स्थान होते राजांसाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. छत्रपती राजे यांच्यामुळेच पन्हाळा गडावर विशाळगडला रवाना होतात.
शिवचरित्र लाल कापडात गुंडाळून न ठेवता युवा पिढीच्या लाल रक्तात घुसला पाहिजे,म्हणजे घराघरात शिवा काशीद सारखे योद्धे जन्माला येतील.शिवाजी महाराज आणि शिवा काशीद यांचे गुरू शिष्याचे नाते व स्वराज्यासाठी शिवा काशिदाचे बलिदान हा इतिहास अजरामर असल्याचे प्रतिपादन प्रा.पवनकुमार पाटील यांनी केले.ते पन्हाळा येथे शिवा काशीद यांच्या ३६२ व्या पुण्यतीथीच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव काशीद होते. या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.आर. टिपूगडे(आण्णा) विभागीय अध्यक्ष मारुतीराव टिपूगडे, जिल्हा अध्यक्ष सायजी झुंझार,मनोहर झेंडे(बापू)रविकिरण इंगवले.रवींद्र धडेल, तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून लोक वीर शिवा काशीद याच्या पुण्यतिथी ला लोक येत होते .
सुरवातीला नेबापूर येथील नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीला माजी नगराध्यक्षा सौ.रुपाली धडेल,पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सरपंच प्रतिभाताई पाटील,देवस्थान कमिटीचे सचिन शिवराज नायकवडी यांच्या हस्ते अभिषेक करून अभिवादन करण्यात आले. तसेच चार दरवाजा येथील शिवा काशीद पुतळा व बाजीप्रभू देशपांडे पुतळा आणि शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळ्यास अभिवादन करून मुख्य कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोदय व्यक्त केली.तर विविध स्तरावर यश संपादन केलेल्या नाभिक समाजातील गुणवंतांचे सत्कार करण्यात आले.राजर्षी शाहू पुरस्कार प्राप्त सचिन जाधव(सोळंकुर) शिक्षक बँक नूतन संचालक रामदास झेंडे(पुनाळ) दहावी मध्ये शंभर टक्के मिळवलेला वेदांत झेंडे (जयसिंगपूर)आणि शिवा काशीद यांचे वंशज डॉ.अवधुत रामचंद्र काशीद यांनी बी एच एम एस परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर पदवी मिळवल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आले.
संग्राम माटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेशभूषा तर विश्वास गंगाधर यांनी मावळ्यांचा वेशभूषा या पुण्यतिथी सोहळ्यात आकर्षण ठरली.यावेळी संग्राम माटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषातून विटा शस्त्रांचे प्रात्यक्षित करून दाखवलीत समाधी स्थळा पासून सभा गृह पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
विशेष कामगिरी बद्द्ल जिल्हा अध्यक्ष सायजी झुंझार,संवर्धन कमिटी अध्यक्ष संतोष चव्हाण व माजी उपाध्यक्ष विश्वास गंगाधर यांचे सत्कार केले.
यावेळी सुनील काशीद, सौ.दीपा काशीद,अनिल संकपाळ,शहर अध्यक्ष विवेक सुर्यवंशी,श्रीकांत झेंडे, पत्रकार रामचंद्र काशीद, रामचंद्र संकपाळ,सुनील इंगळे,,वसंतराव रोखडे,कोषाध्यक्ष दिनकर चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष कृष्णात बामणे,पांडुरंग भोसले, कृष्णात टिपूगडे, दीपक माने, रामचंद्र शिंदे,,रवींद्र काशीद, दीपा काशीद प्रवीण काशीद,संजय काशीद तानाजी फडतारे(सावकार) पोलीस पाटील संदीप काशीद व किरण बुचडे हजर होते.