
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी.
कोरेगांव करंजखोप गावचे भूमिपुत्र शांत आणि मनमिळाऊ आणि गेले तीन-चार वर्षापासून करंजखोप गावचा सरपंच या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या कार्य काळामध्ये करंजखोप गावचा चांगला विकास झाला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तसेच ग्रामस्थ यांच्यासह गावांमध्ये विविध योजना राबवत अनेक कामांना त्यांनी निधी उपलब्ध करुन गावांतील शिवार रस्ते नालाबंदी अशा अनेक कामे पूर्णता केली. लालासौ नेवसे हे शेतकरी कुटुंबातील असून सर्वांशी शांत मनमिळावू प्रेमळ असा त्यांचा स्वभाव आहे. गावातील तसेच गोरगरिबांच्या अडचणीसाठी ते नेहमी धावून येत असत. महाराष्ट्र शासनांच्या वतीने काही योजना ग्रामीण भागांत येत असतात अशा योजना आल्यानंतर त्याची स्वता ग्रामपंचायती मध्ये सर्व सहकारी तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थिंतीत त्याची मीटिंग घेऊन त्या विषयांवर चर्चा करुन तो विषय नेवसे हे अमलांत आणतात. करंजखोप सह सर्व पंचक्रोंशीतील भागांमध्ये विविध कार्यक्रमांना त्यांची प्रमुख उपस्थिती असते. एवढेच नव्हे तर ते सुखदुःखांच्या प्रसंगीला हे नेहमी ते धावून येत असतात. कोरोनांच्या काळामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी आपल्या सहकारी तसेच ग्रामस्थासमवेंत कर्तव्यदक्ष ठरली. कोरोना काळात सुद्धा गावांतील सर्व ग्रामस्थांसह नागरिकांना माता बहिणींना आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यांचे आवाहन नेहमी करीत होते. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमांतून व सोशल मीडियावरुन देत होते. श्री. नेवसे यांची कोरोना काळातील कामगिरीही सुद्धा करंजखोप करांसाठी कर्तव्यदक्षच ठरली. सातारा जिल्ह्यांतील सर्व पत्रकार तसेच सोशल मीडियाला त्यांचे नेहमी सहकार्य असते तसेच वर्धापन दिनानिमिंत्त त्यांचे सर्व पत्रकार व मीडिया यांना मोलाचे सहकार्य असते. त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त करंजखोप ग्रामपंचायत सर्व सदस्य कमिटी तसेच त्यांचे सर्व सेवक वर्ग कर्मचारी आणि गावातील मित्रपरिवार तसेच माता बहिणी यांच्या सह उत्तर कोरेगांव तालुक्यांतील अनेक मान्यवरांकडूंन सदिंच्छा भेट घेत व सोशल मीडियावरुन श्री. लालासौ नेवसे सरपंच यांना शुभेच्छा देण्यांत आल्या. यावेळी सरपंच श्री. लालासौ नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.