
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
देशात मागील दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणांत वाढले होते त्यानंतर महाराष्ट्रांत नवीन सत्ताधर स्थापन होताच गुरुवारी दुपारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारकडूंन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या बाबींवर शिंदे सरकारकडूंन काही निर्णय घेण्यांत आले. यामध्ये पेट्रोल पाच रुपये तर डिझेलचे तीन रुपयांनी कपात करण्यांत आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधन दर कपात करण्यात असल्यांची त्यांनी घोषणा केली पेट्रोल व डिझेलच्या निर्णयांमुळे राज्यांच्या तिजोरीवर सहा कोटीचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणीच्या काळात कारागृहामध्ये गेलेल्या लोकांसाठी पेन्शन योजना पुन्हा सुरु करणार असल्यांची त्यांनी घोषणा केली महाविकास आघाडी सरकारांने कोरोना काळातील आर्थिक अडचणीचे कारण देत ही पेन्शन योजना बंद केली होती. राज्यांतील फडणवीस हे सरकार ठाकरे सरकारांचे निर्णय पुन्हा बदलणार असल्यांचे यामध्ये स्पष्ट संकेत दिले यापैकी आता महाराष्ट्रांतील सरपंचाची आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून करण्यांचा निर्णय नव्या सरकारांने घेतला. तसेच या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्या़चा निर्णय शिंदे सरकारांने घेतला आहे.