दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मराठवाड्याचे भगीरथ जलनायक डॉ.शंकरराव चव्हाण यांची जयंती लोहा न.पा. ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक केतन खिल्लारे, नगरसेवक संदीप दमकोडवार, पत्रकार केशव पवार, बाळासाहेब कतुरे, आदी उपस्थित होते.
