
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
महाराष्ट्र राज्यासह अनेक जिल्ह्यात सतत ८ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे व गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबिन सह इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. गेल्या चार – पाच दिवसांपासून सुर्याचे किरण पण कोमल पिंकावर पडले नाहीत तर या सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाली व शेतकऱ्यांना दुहेरी पेरणीचे साजवट डोक्यावर आल्याने महसुल विभाग कृषी विभाग यांनी तात्काळ लक्ष देऊन शेतातील पिकांचे पंचनामे करावेत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत तात्काळ द्यावी अशी मागणी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केली आहे.
शेतीतील सोयाबीन , कापुस , मुग उडीद तुर ऊस , सर्व पिके मागील ८ दिवसापासून पाण्यातच आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. कोवळया मोडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही भागांत तर अक्षरक्षः अख्खे शेत गोगलगायींनी फस्त केले आहे.
या याकडे तातडीने कृषी विभाग जिल्हा कृषी अधिकारी, तहसिलदार व विमा कंपनी यानी त्वरीत लक्ष देवून सर्व पिकाचे पंचनामे करुन शेतक-यांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केली आहे