दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा:-आडोसी आरोग्य पथकास भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना सुचना ही दिल्या.
पुढील काळात कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची ग्वाही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चत्तर यांनी दिली आहे.
यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की आरोग्य पथकाचे इमारत दुरुस्ती व कर्मचारी निवासस्थानाचे दुरुस्ती चे निकृष्ट कमाची चौकशी करावी.तसेच सर्व कर्मचारी यांनी निवासस्थानी मुक्कामी रहाण्याची सुचना केली आहे.
यावेळी श्री तुकाराम पवार यांनी देखील आरोग्य समस्या मांडुन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. या प्रसंगी श्री प्रदीप वाघ, श्री तुकाराम पवार, डॉ भाऊसाहेब चत्तर, श्री. राहुल कदम, श्री दिंगबर पाटील, श्री देवचंद जाधव, भाऊ दोरे, नंदकुमार वाघ, पवार सर, डॉ मथुरे, नर्स वैशाली पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
