दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: हिंगोली लोकसभा मतदारसंघात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती व पिके नष्ट झाली असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व तहसीलदार यांना फोन करून मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशा पद्धतीच्या सूचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार श्रीमान रामदास पाटील सुमठाणकर साहेबांनी सूचना दिलेली आहे…
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रनिहाय पाहणी साहेब करतील व तशा पद्धतीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामार्फत योग्य ती मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत…
व तसेच रामदास पाटील सुमठाणकर साहेबांनी हिमायतनगर तालुक्याचे प्रभारी तहसीलदार साहेब यांना फोन द्वारे सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांची पिके मुसळधार पावसाच्या पाण्याने नष्ट झाली आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे तरी तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत द्यावीअसे
रामदास पाटील सुमठाणकर यांनी प्रशासनाला सांगितले.
