
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेल्या शिऊर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लताबाई नवनाथ आढाव यांची बिनविरोध निवड झाली आहे, उपसरपंच रामेश्वर जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदासाठी दि १५ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात लताबाई आढाव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान येथील उपसरपंच रामेश्वर जाधव यांनी एप्रिल महिन्यात राजीनामा दिला होता यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली.
१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत जानेवारी २०२० मध्ये रामेश्वर जाधव यांची उपसरपंच पदावर निवड झाली होती ठरल्या प्रमाणे जाधव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मार्च २०२२ रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे रीतसर राजीनामा सोपवला होता तहसीलदार राहुल गायकवाड यांनी उपसरपंच पदासाठी १५ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. या निवडणुक अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एम.एम.तांबूस यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शिऊर ग्रामपंचायतीवर आता महिला राज
तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या शिऊर ग्रामपंचायतीवर आता महिला राज असणार आहे, सरपंच राजश्री जाधव व उपसरपंच लताबाई आढाव हे शिऊर गावाचा कारभार बघणार आहेत.
राज्याच्या राजकारणाची शिऊर येथे पुनरावृत्ती
राज्यात झालेल्या सत्तांतर नाट्यचा दुसरा प्रयोग शिऊर येथे देखील बघायला मिळाला, सत्ताधारी गटात उपसरपंच पदावरून सुंदोपसुंदी सुरू असताना
विरोधी गटाने आढाव यांना उपसरपंचपदाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.
बाळा पाटील पुन्हा एकदा चर्चेत
पती पत्नी एकाचवेळी सदस्य म्हणून ग्रामपंचायत सभागृहात निवडून येण्याचा ऐतिहासिक प्रयोग यशस्वी केल्यानंतर आपल्या धडाकेबाज कामाच्या पध्दतीने त्यांनी प्रशासनावर वचक बसवला आहे, विरोधी बाकावर असताना देखील त्यांनी आपल्या कर्तव्यकुशलतेने नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहे, आजच्या उपसरपंच पदाच्या निवडणूकित त्यांनी महत्वाची भूमिका घेतल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.