दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी चंद्रपूर-प्रदिप मडावी
जगभर पसरलेल्या कोरोनाची लाट चंद्रपूर जिल्ह्याला देखिल पोहचली होती .याच कालावधीत कंत्राटी पद्धतीने काही परिचारकांना कामावर घेतले होते . दरम्यान महाभयानक कोरोना संकट काळात या परिचारिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र जिव धोक्यात टाकून शासकीय रुग्णालयात प्रामाणिकपणे काम केले आहे.मागिल दोन वर्षांपासून काम केल्या नंतर साहजिकच या वेळच्या नविन भरतीत आपल्याला परत संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती परंतू आता त्यांचे या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. नव्यानेच सुरू असलेल्या भरतीत जिल्हा बाहेरील उमेदवारांना संधी दिल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.आपणांस या भरतीत परत एकदा संधी देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे दिलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच सादर केलेल्या निवेदनावर मनिषा बारसागडे ,संजिवनी गेडाम , दक्षता हनुमंते ,प्रफुल उराडे, सिमा गवई , रक्षा वानखेडे , संगिता कातकर , विशाल सहारे,दत्तसाई वासेकर,प्रगती तावाडे ,मोनिका नंदेश्वर,पुजा देवगडे ,रोहन वासेकर ,सपना उमरे, शंकुतला शेडमाके ,शितल मेश्राम ,ऐश्वर्या कोतपल्लीवार ,प्रियंका मेश्राम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.आपणांस अनुभव असून देखील या भरती प्रक्रियेत डावलण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या कडे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष पूरवावे अशी देखील त्यांची मागणी आहे.
