दैनिक चालू वार्ता आटपाडी प्रतिनीधी – दादासो वाक्षे
15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उन्नती महिला विकास फाउंडेशन आटपाडी व भारतातील नामांकित व अग्रेसर कंपनी टाटा मोटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आटपाडी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स येथे भारत सरकारच्या कमवा व शिका अभियानांतर्गत काम करण्याची व ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मध्ये तीन वर्षाचा मोफत डिप्लोमा करण्याची संधी उन्नती महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाली . बारावी पास विद्यार्थी या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहिले . या रोजगार मेळाव्यात साधारण 50 विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर 12850 रुपये विद्यावेतन प्रति महिना विद्यार्थ्यांना मिळणार आहे तसेच आरोग्य विमा व एक्सीडेंटल विमा मिळणार आहे . एक वेळचे जेवण चहा नाष्टा कंपनी विद्यार्थ्यांना पुरवणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गरीब होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना पुणे सारख्या शहरच्या ठिकाणी टाटा मोटर्स सारख्या कंपनीत काम करण्याची संधी मिळालेली आहे . या मेळाव्यासाठी एनटीपीएफ चे मॅनेजर विवेक सिनारे व त्यांची टीम उपस्थित होते . अध्यक्ष उन्नती महिला विकास फाउंडेशन आटपाडी तथा उपाध्यक्ष सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी इंजिनीयर अनिता पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले . आशाताई देशमुख अर्चना देठे उपस्थित होत्या.
” गरजू होतकरू विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स सारख्या कंपनीत काम करण्याची संधी व डिप्लोमा करण्याची संधी मिळवून देऊ शकले त्याचा आनंद आहे . गोरगरीब विद्यार्थी तीन ते चार लाख फी भरून डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना कमवा व शिका अभियानांतर्गत चांगली शिक्षण घेता यावे यासाठी उन्नती महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी देऊ शकले यातच समाधान आहे , हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती करून आई-वडिलांचे नाव करतील असा विश्वास आहे “
