
दैनिक चालु वार्ता मोलगी प्रतिनिधी -रविंद्र पाडवी
ता.२० जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना संघटने कडून महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा च्या बालकांना गरम होता आहार बचत गटांकडून पुरवण्यात येतो मात्र महागाई भयंकर वाढल्याने बचत गटांना आहार शिजवून पुरवणे शक्य होत नाही त्यामुळे बचत गट यांनी अंगणवाडी केंद्रावर आहार पुरवठा बंद केला आहे अशा परिस्थितीत मा आयुक्त नवी मुंबई यांनी दिनांक १४.७. २२. रोजी तसेच माननीय जिल्हा कार्यक्रमाधिकारी मा बावी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिनांक 18 जुलै 22 रोजी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना पत्र पाठवले आहे की जर बचत गटआहार शिजून देण्यास तयार नसतील तर अंगणवाडी कर्मचारी यांनी स्वतःच्या पैशाने आहार खरेदी करून व तो आहार शिजून बालकांना वाटप करायचा आहे असा आदेश दिल्याने अंगणवाडी कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून अंगणवाडी सेविका यांचे मानधन तूटपुंजा स्वरूपाची असून या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अंगणवाडी कर्मचारी आहार खरेदी करून शिजवून वाटप करणार नाहीत तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी सक्ती केल्यास लेखी स्वरूपाची तक्रार संघटनेकडे द्यावी. आहार खरेदी करणे व शिजून देणे याच्यावर अंगणवाडी कर्मचारी बहिष्कार टाकत आहेत कोणाच्या दबावाला बळी पडू नये असे आवाहन संघटनेने दिले असून आयुक्त व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कार्यक्रमाधिकारी व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना संघटनेने पत्र दिले आहे असे अंगणवाडी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी सांगितले आहे