दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर :- अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील मन्याड नदीवरील पूल व रस्ता वाहुन गेला अहमदपूरला येण्या जाण्यासाठी दळवळणाचा हाच मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरील गावातील नागरिकांना हा एकमेव रस्ता असल्याने या पूलाचे काम तातडीने होने ही काळाची गरज आहे. महिला ,वयोवृद्ध नागरिक, शाळा चालू आहेत तरी शाळेतील मुले यांना तसेच युवकांनाही यावे जावे लागते. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील मन्याड नदीवर लवकरच पुल व रस्ता दुरुस्त करावा अशी अपेक्षा या रस्त्यावरील गावातील नागरिक करित आहे. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव, शेंद्री या गावातिल नागरिक याच रस्त्याने ये जा करत असतात
सुनेगाव शेंद्री गावाजवळील मन्याड नदीवर असलेला पुल काल रविवारी रात्री १० वाजता झालेल्या पावसात संपूर्ण पुल व रस्ता वाहुन गेला असून रहदारी बंद पडली आहे .शेतकयांचा खरेदी व शेतमाल विक्रीच्या दृष्टीने अहमदपूर येथील बाजारपेठेशी दररोज संपर्क येतो.या रस्त्यावरील गावातील आजारी व्यक्ती यांना दवाखाण्यात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे . मात्र हा पुल व रस्ता पाऊसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे वाहुण गेला
अखेर हा संपूर्ण पुल रविवारी रात्री झालेल्या पावसाने पूर्णपणे वाहुन गेला असून या रस्त्यावरील गावांच्या नागरीकांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे बंद झालेला आहे तरी हा पुल व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी या रस्त्यावरील गावातील नागरिक व सरपंच सौ उषा गोपीनाथ जायभाये यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे
