दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. संजय मोरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज त्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
या प्रकरणी आवश्यक असणा-या सर्व परवानग्या, शासन, प्रशासन व महाराष्ट्र राज्य मेडिकल काऊन्सिल असोसिएशन तसेच अन्य ज्या ज्या विभागाकडून लागणारी सर्व कागदपत्रे लवकरच प्राप्त केली जातील असा विश्वास डॉ. मोरे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी व्यक्त केला.
अखेर परभणीकरांचे स्वप्न साकार झाले आहे असे सांगून जो काही कालावधी यापूर्वी लागला तो पर्यंत तर आपण धीर धरलाच आहे परंतु तसे काही जास्त थांबावे लागणार नाही असा विश्वास देत अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी लवकरच पहिले वर्षांचा अभ्यासक्रमही सुरु केला जाईल व त्यानंतर दुसरे-तिसरे अशा अनुक्रमाने लागणारे शैक्षणिक कार्य पूर्णत्वास नेणे सोपे जाईल असे सांगितले.
सदरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत सुरु करण्यात यावे म्हणून परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती. मागणी मान्य न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशाराही जाधव यांनी त्यावेळी दिला होता. त्याचेच फलित म्हणून आज हे वैद्यकीय महाविद्यालय परभणी क्रांती या सेवेत रुजू झाले आहे. मागील दोन अडीच वर्षांपासून खा. जाधव यांनी नागरी विकास कामांचा नि नवनवीन सुविधांयुक्त प्रकल्प प्राप्त करुन घेण्याचा जो सपाटा चालविला आहे तो खरोखरच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल.
