
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी जिल्ह्यातील समस्त शिवसैनिक मग त्यात पदाधिकारी असो वा कार्यकर्ता हे सर्वजण शिवसेना व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबतच हेतू व भविष्यातही ते कायम राहावी व असा ठाम विश्वास जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी नुकताच परभणी येथे दिला. शिवाजी चौक परिसरात जमलेल्या असंख्य शिवसैनिकांनी श्री. कदम यांच्याकडे सुपूर्द केलेल्या संमती पत्रानंतर त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार परभणीसह राज्यात सर्वत्र संमती पत्रकं जमा करण्याची मोहीम जोमाने सुरू आहे.
शिवसेनेत पडलेली उभी फूट शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून नाशिक मध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासमयी झालेली प्रचंड गर्दी उफाळून आल्याचे दिसून आलीय.
राज्यात पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे आढळून येत असतांना परभणीमध्ये मात्र खासदार संजय जाधव आणि आमदार राहूल पाटील यांची भूमिका एकच असयाचे दिसत आहे. अन्यवेळी वैचारिक मनोमिलन नसले तरी यासमयी शिवसैनिकांचा एकोपा आणि संमतीपत्रांविषयीचा पुढाकार या भूमिका दोघेही नेटाने राबवित असल्याचे दिसून येत आहे. पक्ष फुटीचं ते ग्रहण परभणी किंवा जिल्ह्यात कुठेही लागले जाऊ नये असेच त्यांना वाटत असावे. जिल्ह्याची अभेद्य शिवसेना उध्दव ठाकरे यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभी राहिली जावी जणू असाच त्या दोघांचाही हेतू असावा कारण त्या दोघांनाही बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेली ऑफर फेटाळल्यावरुन स्पष्ट होत आहे.
या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने झालेली हजारोंच्या संख्येतील संमती पत्रं मुंबईहून आलेले संपर्कप्रमुख यांच्याकडे ती सुपूर्द केली जाणार असल्याचे समजते.