
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
मतदारसंघात सतत होणारा मुसळधार पावसाने थैमान घातले असल्याने बळीराजावर आसमानी सुलतानी संकट कोसळलं असल्याच्या पार्श्वभूमीवर लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोहा तहसील कार्यालयात प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, लोहा कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,विक्रांत दादा शिंदे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते विक्रांतदादा श्यामसुंदर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,कंधार खरेदी विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन पवार, कंधार तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार, नायब तहसीलदार अशोक मोकले,लोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शैलेश वावळे, माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर,लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम पाटील पवार, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के,
लोह्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आढावा बैठकीत बोलताना आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की,लोहा कंधार मतदारसंघात सततच्या पावसाने मतदारसंघातील शेतकरी राजा असमानी सुलतानी संकटात संकटात सापडला असल्याने मतदारसंघातील अतिवृष्टीने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या सूचना यावेळी आमदार शिंदे यांनी आढावा बैठकीतील उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांना दिले, यावेळी आमदार शिंदे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना नम्र विनंती केली की मी आमदार म्हणून मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवांच्या सोबत असून माझ्या शेतकरी बांधवांनी खचून न जाता हा काळ धिराने घ्यावा मी सर्व शेतकरी बांधवांना सरसकट आर्थिक मदत मिळून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.