
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
सोलापूर : उजनी धरणात सध्या ९९.१८ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. धरण प्लस ६५ टक्क्यांवर पोचले आहे. ८ जुलैपासून जिल्ह्यात आठ-दहा दिवस पाऊस झाला, पुन्हा तो बंद झाला. पण, पुणे जिल्ह्यात पाऊस झाल्याने वरील धरणांतून पाणी सोडले जात आहे. ते पाणी साडेअकरा ते १२ हजारांच्या विसर्गाने दौंडमधून उजनीत येत आहे. उद्या (रविवारी) धरणातील एकूण पाणीसाठा १०० टीएमसीवर जाईल, असा विश्वास जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने (११० टीएमसी) भरूनही उन्हाळ्यात कधीच प्लसमध्ये राहिलेले नाही. सोलापूर, उस्मानाबाद, नगर, पुणे, चिंचोली बारामती एमआयडीसी यासह एमआयडीसीतील उद्योगांना पाणी दिले जाते. शेतीसाठीही मुबलक पाणीपुरवठा केला जातो. उजनीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप मोठा बदल झाला आहे.
सोलापूर, उस्मानाबाद, नगर, पुणे, चिंचोली बारामती एमआयडीसी यासह एमआयडीसीतील उद्योगांना पाणी दिले जाते. शेतीसाठीही मुबलक पाणीपुरवठा केला जातो. उजनीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप मोठा बदल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक झाली आहे. उजनीच्या भरवशावर जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली. शेतकऱ्यांना भरवशाचे पीक उसाचा मोठा आधार आहे. हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना इतर पिकांमधून नुकसानीलाच सामोरे जावे लागत असल्याने दोन वर्षांत एक लाख हेक्टरवर ऊस वाढला आहे.
मागील हंगामात ३४ ते ४० कारखान्यांनी उसाचे गाळप केले. ऐन उन्हाळ्यात माना टाकणाऱ्या पिकांना उजनीमुळे जीवनदान मिळते. दुसरीकडे, सोलापूर शहरवासीयांची तहान भागविली जाते. उजनीमुळे जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा कमी झाल्या. विशेष बाब म्हणजे रब्बीचे
सर्वाधिक क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात आता खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
पंधरा दिवसांत ४२ टीएमसी पाणी उन्हाळ्याच्या झळा वाढत असतानाच जून महिन्यात एकदाही पाऊस पडला नाही. ८ जुलैला उजनीतील पाणीसाठा मायनस ६.८४ टीएमसीपर्यंत खाली आला होता. पण, आता १५ दिवसांतच धरणात ४२.१८ टीएमसी पाणी आले आहे. त्यामुळे धरणात सध्या प्लस (जिवंत) ३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनीमुळे जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करणारे टँकर बंद झाले आहेत.