
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
पुणे जिल्हा (शिंदेवाडी) गावचे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम महिला पोलीस पाटील सौ.उषाताई शिंदे यांची कामगिरी सुद्धा नेहमी कर्तव्यदक्ष ठरत आली असुन त्यांच्या प्रत्येक कामाची पोचपावती पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यांमध्ये चांगलीच आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत गेल्या अनेक वर्षापासून पुणे जिल्हा शिंदेवाडी अंतर्गत येणाऱ्या गावच्या त्या पोलीस पाटील म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कामकाज पाहत असुन. गावांतील काही तक्रारी त्या स्वताच गावामध्ये बैठक घेऊन तक्रारींना सामोरे जात असत. गावातील छोटे-मोठे वादीवाद तंटे हे ते स्वता आपलेच गाव पातळीवर योग्य तो मार्ग काढून त्यांच्यासमोर असणारे प्रश्न त्या नेहमीच स्वता मोडीत काढतात. आणि त्या माध्यमांतून पोलीस प्रशांसनाला सुद्धा त्यांचे नेहमीच सहकार्य असते. शिंदेवाडी गावच्या पोलीस पाटील सौ.उषाताई शिंदे या पुणे जिल्ह्यांमधील पहिल्यांच महिला उत्कृंष्ट पोलीस पाटील म्हणून त्यांचे नाव आज राज्य गृह विभागांने जाहीर केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल आणि उत्कृंष्ट सेवेबद्दल प्रशासकीय पत्रक देवुन त्यांना गौरविण्यांत आले. हे प्रशासकीय पत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिंत त्यांना देण्यांत आले.यावेळी शिंदेवाडी ग्रामस्थांसह,आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे सर्व सहकारी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनवजी देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंन्सल व सातारा जिल्ह्यांतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडूंन महिला पोलीस पाटील सौ.उषाताई शिंदे यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन व कौतुक करण्यांत आले.