
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा :दि .२६ जुलै
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असुन देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे.परंतु अमृतमहोत्सव साजरा करत असतांना मुस्लिम समाजाचा एकही सदस्य बुलडाणा जिल्हा परिषदेत निवडुन आलेला नाही. हे सत्य स्विकारून काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना ह्या जातीयवादी पक्षांना धडा शिकविण्यासाठी व अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करीत केला. आज देशात वंचित बहुजन आघाडीकडे संपूर्ण बहुजन समाज एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे.अशा भावना पक्ष प्रवेश केलेल्या युवकांनी ह्यावेळी व्यक्त केल्या. वडनेर भोलजी येथील सामाजिक सभागृहात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. एकूण ५५ मुस्लिम युवकांचा पक्षाचा दुप्पटा पुष्प गुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ह्यावेळी शरद वसतकार उपाध्यक्ष पश्चिम विदर्भ, गणेश चौकसे जिल्हा अध्यक्ष, भगवान वाकोडे जिल्हा उपाध्यक्ष, आतीष खराटे जिल्हा महासचिव , वसंता तायडे जिल्हा संघटक, अनिल वाकोडे जिल्हा अध्यक्ष युवा, निंबाजी बाजोडे, डाॅ. मो.जमीरोद्दीन शमीओद्दीन जिल्हा कोषाध्यक्ष युवा आघाडी,अजाबराव वाघोदे तालुका अध्यक्ष,गणेश वानखडे जिल्हा सहसचिव,शे.चाँद, शेख इसाक, अनिल तायडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रल्हाद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या कार्यक्रमाचे संचलन भगवान इंगळे व आभार प्रदर्शन अॅड.सदानंद ब्राह्मणे यांनी केले. पाऊस सुरू असतानाही सभागृहात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.