
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- नॅशनल हेरॉल्ट प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचनालाय (ED) ने पुन्हा चौकशी करिता बोलविल्यामुळे देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुका व शहराच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलन हे महात्मा गांधी यांच्या शांततापूर्ण मार्गाने करण्यात आले असून याप्रसंगी भाजप व मोदी विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनस्थळी काँग्रेस कार्यकर्त्यामद्धे आपले विचार मांडण्यात आले असून काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी या प्रकरणात कशाप्रकारे निर्दोष मुक्त आहेत हे पदाधिकार्यांनी आपल्या भाषणात विचार मांडले व त्यानंतर धरणे आंदोलन विसर्जित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार बळवंतजी वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू,शहराध्यक्ष प्रदीप देशमुख,निखील कोकाटे,मिर्झा जहीर बेग,सुधाकर खारोडे,विदर्भकुमार बोबडे,राजू कुरेशी,आशिक अन्सारी,सलामोद्दीन,सोहेब खान,सुरेश आडे,पुरुषोत्तम घोगरे,अमित गोंडचोर,किशोर खडसे,रमेश सावळे,नाजीम खतीब,आसिफ मन्सुरी,दिलीप खडगे,नागोराव वाहूरवाघ,सुरेंद्र वानखडे,मनोज लहुपंचांग,निवृत्ती तुरखडे,अजय डिके,गोपाल गावणेर,निलेश ढगे,विनोद हाडोळे,विजय दामले,मिलिंद निचळ,प्रेमदास हेरोळे,बाळू पाखरे,विनोद कावनपुरे,अ.रशीद,वि.सा.वानखडे,रघुनाथ वानखडे,राजेश चोरपगार,कैलास शिरसाठ,कैलास इंगळे,पुरुषोत्तम गावंडे,राजेश भांबुरकर,शरद लव्हाळे आदी आंदोलनवेळी कार्यकर्ते उपस्थित होते.