
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-बडनेरा येथील बसस्थानकासमोर भर रस्त्यावर ३२ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मंगळवार दि.२६ जुलै रोजी दुपारी १:३० वा.च्या सुमारास घडली.मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून,बडनेरा पोलीस मारेकरांच्या मागावर आहेत.
प्राप्तमाहितीनुसार,अमरावती जिल्हयातील बडनेरा येथे मिल चाळीत राहणारा अंकुश सागर मेश्राम (वय वर्षे ३२) याच्या सोबत काही युवकांनी भाईगिरीच्या वर्चस्वावरून वाद केला.या वादावरून त्या युवकांनी अंकुश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना बडनेरा बसस्थानक परिसरात घडली.नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेले बडनेरा बस स्थानकासमोर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती.