
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सुतार समाजातील कारागीर म्हणून ओळख आसलेले व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशी मध्ये सुतार कामासाठी प्रसिद्ध आसणारे कैलासवासी. रामचंद्र (भाऊ) सुतार वय वर्ष ८१ यांचे दुःखद निधन झाल्यामुळे सुतार परिवारा वरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन सुना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे. गोरक सुतार यांचे बंधु तर दादासाहेब सुतार व बालाजी सुतार यांचे ते वडील होते. पत्रकार बाळासाहेब सुतार व माजी सरपंच हारीभाऊ सुतार यांच्या सहित सर्व बंधुंचे चुलत भाऊ होते.