
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
कंधार:-पंधरा दिवसापासून कंधार तालुक्यात सततच्या पावसामुळे गेल्या पंधरा दिवसापासून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता जाधव व्यंकटी गोविंद, पांडुरंग कंधारे, गोविंद मुगावे, आनंदा भागानगरे, माधव मेकवाड,बालाजी पांचाळ, बालाजी मेकवाड आदींनी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री साहेब व तहसीलदार साहेब कंधार यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 50000 रूपयाची तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे.