दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना
कोरपना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोरपना अंतर्गत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिपक नागले यांनी केले कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणुन डॉ एस पी कळमकर पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ गडचांदूर व डॉ व्हि आर गड्डमवार पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ मांडवा यांचा पशुसंवर्धन विभागा कडुन शाल व श्रीफळ गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला तसेच नव्याने पदोन्नती झालेले श्री इस्माईल खान पठाण व श्री सुरेश येनप्रेड्डीवार यांचे व्रणोपचारक या पदावर पदोन्नती झाल्याने, व नव्याने रुजू झालेले डॉ जोत्सना इंगोले मॅडम, डॉ कपिल ढेंगे तसेच डॉ जगदीश बोढे, पशुधन पर्यवेक्षक डॉ संदीप आडे पशुधन पर्यवेक्षक, श्री आनंदराव सोनटक्के परिचर यांची बदली झाली असल्याने या सर्वाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ दिपक नागले पशुधन विकास अधिकारी फिरते पशुचिकित्सालय गडचांदूर, डॉ संदीप राठोड पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ काशिनाथ झाडे, डॉ तिनखेडे, डॉ प्रविण पिदुरकर डॉ हरिदास ढेंगळे, श्री निरंजने, श्री डाखरे, श्री बोधे श्री भोयर हे उपस्थित होते. डॉ हरीदास ढेंगळे यांनी सर्वाचे आभार मानले.
