
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी- प्रमोद खिरटकर
मुलांना शाळेचे वळण लागावे तसेच त्यांना योग्य वाढ होण्यासाठी पोष्टीक आहार मिळावा याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर ने बीबी येथील कोविड मुळे बंद असलेली बालवाडी पुन्हा सुरू केली आहे.
बालवाडी चे उद्घाटन सुधा श्रीराम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिव्या शर्मा मॅडम, पल्लवी घोष मॅडम यांची उपस्थिती होती.
यावेळेस सरस्वती माता व सावित्रीबाई फुले जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मुलांना बिस्किट व चिक्की यांचे वाटप करण्यात आली व मार्गदर्शनात सर्व मुलांना सुधा श्रीराम मॅडम यांच्या द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमात सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉक्टर गोदावरी नवलानी, संजय ठाकरे, देविदास मांदळे व बालवाडी शिक्षिका विद्या कारवटकर मँडम, हेल्पर रजीया शेख यांची उपस्थिती होती.