
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा तालुक्यातील शिवसेनेच्या अनेक शाखा मध्ये आज पक्ष संघटनेच्या वतीने सभासद नोंदणी करण्यात आली.
यावेळी प्रदीप वाघ माजी सभापती यांनी गावोगावी फिरून सभासद नोंदणी मोहीमेत सहभाग घेतला.
यावेळी प्रल्हाद काका कदम विधानसभा संघटक यांनी देखील खोडाळा गावात स्वतः सभासद नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला.सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून सभासद नोंदणी व शपथ पत्रा द्वारे पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व समर्थन दिले आहे.
यावेळी शिवसैनिक प्रल्हाद कदम, प्रदीप वाघ, संजय वाघ, सखाराम शिद, निलेश झुगरे, बलवान देशमुख, अक्षय कोरडे, संदीप मुतडक, नंदकुमार वाघ, पांडुरंग वारे,सोमा शिद, विवेक शेंद्रे, निलेश ठोमरे,रुपेश वळवी,किरण हमरे विष्णु हमरे, संजय हमरे, रमेश बोटे, प्रितम काळे, सुनिल व्यापारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.