
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-सलमान नसीम अत्तार
बुलडाणा…
शिवसेनेमध्ये ४० आमदार आणि १२ खासदारांच्या बंडखोरीनंतरही शिवसैनिक मात्र आपली निष्ठा ही मातोश्री सोबतच कायम ठेवून आहे. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जागतिक पातळीवरील संकटाशी संयमाने आणि धीराने तोंड देऊन महाराष्ट्र सांभाळणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख *मा उद्धवजी ठाकरे साहेब* यांना निरोगी आयुष्य लाभावे असे साकडे बुलढाण्याची ग्रामदैवत मोठ्या देवीला शिवसैनिकांच्या वतीने घालण्यात आले. *मा जालिंदर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा* यांच्या मार्गदर्शना खाली तसेच शिवसेना तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात *पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब* यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप देखील करण्यात आले. शिवसेना ही संकटांना घाबरणारी नाही. निवडून आलेले पळवले जाऊ शकतात, परंतु निवडून देणारे पळवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झंझावत सगळीकडे पाहायला मिळेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे यासाठी देवीला साकडे घातल्याचे लखन गाडेकर म्हणाले.
यावेळी हेमंत खेडेकर माजी नगरपालिका उपाध्यक्ष, अशोक इंगळे विरोधी पक्ष नेते जि प बुलढाणा ,डॉक्टर अरुण पोफळे तालुका प्रमुख वैद्यकीय आघाडी, अमोल बुधवत, विजय वितवारे एकनाथ कोरडे, मनोज यादव, नितीन लोंढेकर ,अमित भालेराव, बबन खरे सचिन परांडे ,जगदीश मानवतकर , भारत बोंडे , राहुल जाधव सतीश राजपूत, संतोष राजपूत, सुधाकर मुंडे, दीपक जंजाळ, सतीश जंजाळ , योगेश निकम , विजय डुकरे, शुभम शेळके यांची उपस्थिती होती.