
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : गुरुवारी संयुक्त अरब अमिराती आणि कतारमध्ये मुसळधार पाऊस पडला. ज्यामुळे सर्व रस्ते पाण्याने भरल्याचे पहायला मिळाले. या आलेल्या पावसामुळे यूएईच्या पूर्वेकडील भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे घरांचे नुकसान झाले आणि अनेक वाहने देखील वाहून गेली.
त्यामुळे अनेकांना हॉटेल्सचा आसरा घ्यावा लागला.
खलीज टाइम्समधील बातमीनुसार, अचानक बदललेल्या या हवामानामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या हवामान विभागाने ‘डेंजरस वेदर इव्हेंट्स’साठी रेड अलर्ट जारी केला आहे. यानंतर सोशल मीडियावर या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यामध्ये पावसानंतर रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यात अनेक वाहने तरंगताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये बचाव कर्मचारी पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवताना दिसत आहेत.