
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सांगली कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा गेले वर्षभरांपासून सांगलीकरांच्या सेवेत असलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार अशोक गेडाम हे सांगलीकरांना कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून लाभले. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेंडाम यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदाचा दिनांक १७ सप्टेंबर २०२० रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्या जागेवर त्यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली. दीक्षितकुमार गेंडाम हे २०११ 11 मध्ये आयपीएस झाले त्यांनी आंबेजोगाई बीड जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत असताना त्यांनी अवैध धंदे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा चांगलाच उभारला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुद्धा दीक्षितकुमार गेंडाम यांची सिंधुदुर्गकरांसाठी सुधा त्यांची कामगिरी कर्तव्यदक्ष ठरली. राज्य गृह विभागांने मागील काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्वच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यांत आल्या होत्या. यामध्ये सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणारे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेंडाम यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यांत आली गेंडामची सांगली जिल्हा या ठिकाणी बदली होताच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचा निरोप घेवुन. सांगली जिल्हा पोलीस दलात दीक्षितकुमार गेडाम यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्याकडूंन पदभार स्वीकारला घेतला. दीक्षितकुमार गेंडाम यांची सांगलीकरांसाठी कोरोना काळातील कामगिरी सुद्धा अत्यंत,पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष ठरली, महापूर तसेच अनेक अवैध धंद्यावर त्यांनी सांगली जिल्ह्यांमध्ये चांगलाच कारवाईचा बडगा उगारला होता. सांगली जिल्ह्यांचा पहिला दिवसापासून जिल्ह्यांचा अभ्यास करुन दीक्षितकुमार गेंडाम यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व कर्मचारी पोलीस पथक यांची त्यांनी प्रथम आढावा बैठक घेवुन सांगली जिल्हा विषयी माहिती मिळवून आपल्या कामकाजाला त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलात सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेंडाम हे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांची पोलीस प्रशासन विभागांमध्ये चांगलीच ओळख आहे. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दीक्षितकुमार गेंडाम हे येणार असल्यांचे समजतात सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. संभाजी गोसावी यांनी दीक्षितकुमार गेंडाम यांच्या दूरध्वनीच्या माध्यमांतून अभिनंदन करुन सातारा सांगली जिल्ह्यांची त्यांना माहितीही यावेळी देण्यांत आली होती. दीक्षितकुमार गेंडाम आणि श्री.गोसावी यांचा गेले तीन वर्षापासून चांगलाच परिचय असल्यांचे दिसून येत आहे. येत्या सोमवारी सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी हे सांगली जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेंडाम साहेब व नुकतेच नव्यांने रुजू झालेले सांगली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी यांची सदिंच्छा भेट घेवुन दोन्ही अधिकाऱ्यांचे गोसावी हे भव्य स्वागत करणार आहेत.